प्रतिष्ठा न्यूज

विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘मान्सून सेलिब्रेशन’ उपक्रमांची धमाल ; वनराई व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांचा संयुक्त उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दि. १ ते १० जुलै दरम्यान सांगली जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांनी ‘मान्सून सेलिब्रेशन’ उपक्रमांची धमाल अनुभवली. वनराई व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हे उपक्रम अटल भूजल योजने अंतर्गत राबविण्यात आले. तसेच भूजल विषयक साक्षरतेसाठीही विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये भूजल विषयक माहिती देणे, मान्सून सेलिब्रेशन दिंडी, विहीर भूजल पातळी मोजणे प्रशिक्षण, पर्जन्यमापक व पीझोमीटर विषयी माहिती व प्रत्यक्ष मोजमाप याचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच selfie with Rain Gauge काढण्यात आली. हे उपक्रम कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव, तासगाव तालुक्यातील वज्रचौंडे, खानापूर तालुक्यातील पळशी , मिरज तालुक्यातील सलगरे, जत तालुक्यातील साळमळगेवाडी इ. ठिकाणच्या शाळांमध्ये घेण्यात आले.
यासाठी वरिष्ठ भूवैज्ञानिक जयंत मिसाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर वनराई संस्थेच्या तज्ञ भूवैज्ञानिक कविता सरवदे, माहिती व शिक्षण संवाद तज्ञ तनुजा मोरे, हणमंत कोळेकर, जलसंधारण तज्ञ ऋषिकेश माळी यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. यावेळी वनराईचे समूदाय संघटक, विविध गावाचे सरपंच, सदस्य,ग्रामसेवक, ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.