प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या सौ.शिल्पा थोरबोले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्यावतीने  घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात तासगांव मधील सौ.शिल्पा रणजीत थोरबोले यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करणेत आले.पुणे थेऊर फाटा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह संचलित,राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पार पडला,या कार्यक्रमासाठी नगरचे खासदार निलेश लंके,आमदार रोहित पवार,आमदार अशोक बापू पवार विधानसभा सदस्य,ऍड. महेशदादा देवकाते पाटील,(सिने अभिनेते )सायली पाटील (सिने अभिनेत्री ), शिवतेजसिंह विजयसिंह मोहिते पाटील,अंकिता पाटील ठाकरे, (भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष) राहुल कुदनर,(संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूह )पश्चिम महाराष्ट्र संपादक, रणजीत थोरबोले,सोमशेखर नाटिकर,दिलीप जाधव (कोकण विभागीय संपादक )तसेच राज्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये 65 जणांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणेत आला.यावेळी सौ.शिल्पा रणजीत थोरबोले यांचा आदर्श शिक्षिका 2024-25 म्हणून मान्यवरांच्या हस्ते शिल्ड,मेडल, सर्टिफिकेट,फेटा देऊन यथोचित सत्कार करणेत आला.थोरबोले मॅडम म्हणून परिचित असणाऱ्या,अत्यंत हुशार,शिस्तप्रिय,नेहमीच शिकवण्यात नावीन्य असणाऱ्या M.Sc. B. Ed. (Maths)DSM झालेल्या आहेत.प्रथम तासगांवमध्ये स्वामी रामानंद भारती जुनिअर कॉलेज मध्ये सात वर्षे,नंतर चाटे जुनिअर कॉलेज येथे पाच वर्षे,सध्या कै. बी. एन. हिरवे विद्यालय शेवरी ता.माण दहिवडी येथे अध्यापनाचे काम करत आहेत,या काळामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना यशस्वी करणेत खारीचा वाटा उचलला आहे,आतापर्यंत त्यांच्या बॅचेसचे अनेक विद्यार्थी, डॉक्टर, इंजीनिअर,अश्या अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत.याआधी त्यांना चाटे शिक्षण समूहातर्फे अध्यापन गौरव पुरस्कार देणेत आलेला आहे.वरील सर्व कार्याचा आढावा घेऊन राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्कार देऊ केला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.