प्रतिष्ठा न्यूज

तासगाव क.महंकाळ मतदार संघातील भाजपचे सुपर वॉरियर्स संवाद बैठक संपन्न… 2024 ची निवडणुक ऐतिहासिक होऊन भाजपचा महाविजय होईल जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगांव : भाजपा पक्षाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे.आपल्या राष्ट्राची विकसीत राष्ट्र म्हणुन ओळख निर्माण करण्याचे काम २०१४ ला सुरु झाले.आज संपुर्ण जगाचे लक्ष आपल्या देशातील विकसीत होणार्‍या शहराकडे व योजनांकडे आहे.*२०२४ ची निवडणुक हि ऐतिहासीक निवडुणक होऊन भाजपा पक्षाचा महाविजय होईल* याचे साक्षीदार होण्याचे भाग्य तुम्हाला आम्हाला मिळणार आहे.२०२९ ला भारत देश संपुर्ण जगाचे नेतृत्व निश्चित करेल असा विश्वास भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांनी व्यक्त केला.तासगांव- कवठेमंहकाळ विधानसभा मतदार संघातील भाजपाचे सुपर वाॅरियर्स यांची संवाद बैठक तासगांव येथे आयोजीत करण्यात आली होती.यावेळी निशिकांत भोसले- पाटील बोलत होते.यावेळी सांगली लोकसभा मतदार संघाचे प्रभारी दिपक शिंदे (बाबा),तासगांव कवठेमंहकाळ विधानसभेचे निवडणूक प्रमुख प्रभाकर संजय पाटील (बाबा) यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील पुढे म्हणाले भाजपा पक्षाचे व्हिजन हे देशाची अर्थव्यवस्था बदलणारी,देशात उद्योग निर्मिती करणारे,नवनविन टेक्नाॅलाॅजी निर्माण करणारे,देशातील प्रत्येक घटकापर्यत विकास योजना पोहचविणारी आहे,देशाची सुरक्षा मजबुत करणारे आहे,भाजपा पक्षाच्या माध्यमातुन देशातील प्रत्येक घटकाचे चांगले भविष्य घडले यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.२०२९ पर्यत आपल्या भारत देशाला विकसित देश म्हणुन संपुर्ण जग निश्चित स्विकारेल.येणार्‍या निवडणुकीत कोणाचा पराभव करायचा म्हणून भाजपाचे काम करु नका तर देशहितासाठी व आपला देश सर्व क्षेत्रात अव्वल ठरावा यासाठी करावे आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.यावेळी सांगली लोकसभा मतदार संघाचे प्रभारी दिपक शिंदे म्हणाले तासगांव कवठेमहंकाळ मतदार संघातील संघटनात्मक काम चांगले झाले असुन वाॅरियर्स म्हणून तुम्हाला निवडले आहे.तुम्ही भाग्यवान आहात तुमच्यावर जबाबदारी देऊन भाजपा पक्षाने मोठा विश्वास टाकला आहे.हा विश्वास आपण येणार्‍या सर्व निवडणुकात निश्चितपणे सार्थ ठरवाल यात शकां नाही.यावेळी बोलताना तासगांव कवठेमंहकाळ विधानसभा निवडणुक प्रमुख प्रभाकर पाटील (बाबा) म्हणाले आपल्या सारखे जिवाभावाचे मावळे भाजपा पक्षाला मिळाले आहेत,भाजपा पक्षाचा विचार घेऊन आपण काम करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे,आपल्या मतदार संघातील सर्वांगीण विकासाबरोबर उद्योग व्यवसाय,दळण वळण व्यवस्था,पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.येणार्‍या निवडणुकीत आपण रात्रीचा दिवस करुन काम करा पुन्हां आपण लोकसभेत या मतदार संघातुन भाजपा पक्षाचा खासदार पाठवु.स्वागत व प्रास्थाविक कवठेमंहकाळ भाजपा मंडलचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांनी केले,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे यांनी आभार मानले,यावेळी अनुसुचित जातीजमाती सेलचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश साबळे,भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गढळे, सांगली जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अनिल पाटील,तासगांव शहर भाजपाचे अध्यक्ष हणमंत पाटील,तासगांव ग्रामिण भाजपाचे अध्यक्ष सुनिल जाधव,विसापुर मंडल चे अध्यक्ष नवनाथ पाटील,भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मिलींद कोरे,सुनील पाटील,विलास काळेबाग,भाजपाचे जिल्हा चिटणीस धैर्यशील मोरे,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दिग्विजय पाटील,चंद्रकांत पाटील,प्रभाकर जाधव,सुमित कुलकर्णी आदिसह अन्य मान्यवर,भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.