प्रतिष्ठा न्यूज

माजी मंत्री जयंत पाटील यांच्या कडून विवेक कांबळे यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी माजी महापौर कालकथीत विवेक कांबळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. यावेळी विवेक कांबळे यांच्या पत्नी रेखा कांबळे, मुलगा श्वेतपद्म, मुली निशा आणि शताब्दी यांच्या सहित कुटुंबीयांतील अन्य सदस्यांची भेट घेतली. श्वेतपद्म आणि कांबळे कुटुंबाच्या पाठीशी कायम राहीन असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, आरपीआयचे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे, राष्ट्रवादीचे राहुल पवार, बाळासाहेब होनमोरे, आयुब इनामदार यांच्यासहित राष्ट्रवादी आरपीआयचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.