प्रतिष्ठा न्यूज

जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेमध्ये सिटी इंग्लिश मिडियम स्कूलचा संघ उपविजेता

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे 
सांगली :  महानगरपालिकेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सांगली, येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बेसबॉल स्पर्धेच्या (सतरा वर्षाखालील) मुलांच्या अंतिम सामन्यामध्ये सांगली शिक्षण संस्थेच्या सिटी इंग्लिश मिडियम स्कूलचा संघ उपविजेता ठरला. हा अंतिम सामना ए.बी पाटील स्कूल सांगली या शाळेसोबत होता. या अंतिम सामन्यामध्ये  सिटी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करून उपविजेते पद पटकाविले.या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना सिटी इंग्लिश मिडियम स्कूलचे क्रीडा शिक्षक पृथ्वीराज देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष माननीय  विजय भिडे, शाळेच्या मुख्याध्यापक  भाग्यश्री कुलकर्णी, प्राथमिक विभाग प्रमुख वर्षा दरूरे, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख मृणाल वाकणकर, शाळेतील इतर सर्व यांनी त्यांचे अभिनंदन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.