प्रतिष्ठा न्यूज

सावळसिद्ध विकास सोसायटीच्या वतीने सभासदांच्या मुला मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदत

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज  दि.३ : सावळज ता.तासगाव येथील श्री. सावळसिद्ध विकास सोसायटी लि. सावळज या संस्थेतर्फे सभासदांच्या मुला मुलींना शालेय शिक्षणासाठी आर्थिक मदत  देण्यात आली. सदरची मदतीचे वाटप संचालक मंडळाच्या उपस्थितीत चेकद्वारे करण्यात आले.
 सावळसिद्ध विकास सोसायटी सध्या शताब्दी महोत्सव साजरा करत आहे. संस्थेस शंभर वर्षे पूर्ण होत आल्याने संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. संचालक मंडळाने सभासदांसाठी सभासद कल्याण निधीची तरतूद केलेली आहे. यामधून संस्थेने यापूर्वी जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. तसेच आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या व हुशार असलेल्या सभासदांच्या मुले-मुली केवळ आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये,म्हणून सभासद कल्याण निधीची तरतूद केली आहे.सभासदातील गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांच्या मुला मुलींसाठी त्यांच्या शैक्षणिक कार्यास मदत म्हणून आर्थिक निधी वितरित केला आहे. सभासदांमधील मागणी केलेल्या  एकूण 10 मुला-मुलींना प्रत्येकी तीन हजार रुपये चे वाटप त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गजानन धोंडीराम पाटील, भीमराव कृष्णा पाटील, सुनील सुबराव पाटील, स्वाती संदीप माळी. दत्तात्रय नामदेव वांडरे, आनंदा शिवाजी पाटील, अनिल जंबू माळी, माया श्रावण सावळजकर, जयवंत विष्णू सदामते  या सभासदांच्या मुला-मुलींना आर्थिक मदत देण्यात आली.
 यावेळी संस्थेचे चेअरमन शिवाजी पाटील, संचालक दत्तात्रय पाटील प्रदीप माळी राजेंद्र सावळजकर, सचिव निलेश रिसवडकर, गजानन पाटील, बाळासो वांडरे, सभासद व विद्यार्थी उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.