प्रतिष्ठा न्यूज

मिरज- सांगली रस्ता कामाची चौकशी समिती गठीत; कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम अधिक्षक अभियंत्यांची लेखी माहिती;सुस्थितीत रस्त्यावर होतोय २९ कोटी निधीचा चुराडा

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज-सांगली रस्ता हा ९५ टक्के सुस्थितीत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुन्हा रस्त्यावर रस्ता चढवून सुमारे २९ कोटींचा चुराडा केला जात असल्याची तक्रार मिरज सुधार समितीने केल्यानंतर या रस्ता कामाची चौकशी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन वरिष्ठ महिला अधिकार्‍यांची चौकशी समिती गठीत केल्याची लेखी माहिती कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधिक्षक अभियंता तु. अ. बुरूड यांनी मिरज सुधार समितीला दिली आहे. चौकशी समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिल्याने सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी चौकशी समितीत मिरज सुधार समितीच्या दोन सदस्यांची नियुक्ती करण्याची मागणी मिरज सुधार समितीचे ऍड. ए. ए. काझी यांनी केली आहे.

मिरज-सांगली रस्त्यावरील वाहतूक कोंडी पाहता हा रस्ता सहा पदरीकरण करणे गरजेचे आहे. ही वस्तुस्थिती असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने महात्मा गांधी चौक ते सांगलीच्या कर्मवीर भाऊराव पाटील चौकापर्यंत हा सुमारे10 किमी अंतराचा 95 टक्के सुस्थितीत असणाऱ्या मिरज- सांगली रस्त्यावर रस्ता करुन सुमारे २९ कोटींचा निधीचा चुराडा केला जात असल्याने स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली होती. सुधार समितीने 19 सप्टेंबर पासून सार्वजनिक बांधकाम मिरज कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
याची गंभीर दखल घेत कोल्हापूर सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता तु. अ. बुरूड यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मार्ग प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती एस. एस. मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली खाली मार्ग प्रकल्प उपविभाग गडहिंग्लज, मुख्यालय, कोल्हापूर श्रीमती पी. जी. बारटक्के यांची दोन सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीला एक महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेशही दिले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.