प्रतिष्ठा न्यूज

विश्वस्तांच्या वादावादीत आणि अलोट गर्दीत तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील प्रसिद्ध श्री गणरायाचा २४४ वा रथोत्सव आज मोरया मोरया च्या गजरात,प्रचंड उत्साहात,अलोट गर्दीत,विश्वस्तांच्या वादावादीने मोठ्या उत्साहात साजरा झाला.दुष्काळजन्य परिस्थितीत सुद्धा लाखो भाविक यावेळी उपस्थित होते.
दुपारी एक वाजता श्रींची पालखी मंदिरात दाखल झाली.त्यानंतर दीड वाजता श्रींची उत्सवमूर्ती रथामध्ये विराजमान झाली.यावेळी ज्या छत्रपती शिवरायांमुळे आपला हिंदू धर्म टिकून राहिला,त्यांच्यामुळे आपण हा उत्सव साजरा करतोय या भावनेतुन छत्रपती श्री शिवाजी महाराज,छत्रपती श्री संभाजी महाराज,यांच्या घोषणां देण्यात आल्या.त्यानंतर राष्ट्रगीत आणि गणपतीचीं आरती झाली.दरवर्षी दीड वाजता सुरु होणारा रथोत्सव यावेळी मात्र विश्वस्तांच्या वादावादीने पंधरा मिनिट वेळाने राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या मध्यस्थीने दोन्ही विश्वस्तांच्या उपस्थितीत सुरू झाला. रथात कोण बसायचं आणि कोण बसायचं नाही,तसेच एक विश्वस्त रथ ओढा आणि एक विश्वस्त रथ ओढू नका म्हणत असल्याचे दिसून आले.त्यामुळे रथोत्सवाला आलेल्या भाविकांच्यात संभ्रम निर्माण झाला. विश्वस्तांच्या वादावादीने उत्सवाला गालबोट लागल्याची चर्चा भाविकांच्यात होती.संपूर्ण महाराष्ट्रातून तासगावच्या या ऐतिहासिक रथोत्सवास लाखोंच्या संख्येने भाविक येतात,परंतु रथावरील वादाने यावेळी उत्सवात गालबोट लागले.पावणे दोन वाजता मोरयाच्या गजरात रथोत्सवास सुरुवात झाली.मोरया मोरया च्या गजरात खोबरे,आणि पेढ्याच्या उधळणीत गणपती मंदिर ते काशी विश्वेश्वर मंदिर व परत गणपती मंदिर असा रथोत्सव पार पडला.हजारो भाविकांनी दोरखंडाच्या साहाय्याने रथ ओढला.
प्रचंड पोलीस बंदोबस्तात हा रथोत्सव उत्साहात पार पडला.यावेळी मंत्री शंभूराजे देसाई,डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,काँग्रेसचें पृथ्वीराज पाटील,भाजपा युवानेते प्रभाकर बाबा पाटील,राष्ट्रवादी युवानेते रोहित दादा पाटील मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या.तालुक्यावर आणि राज्यावर आलेले दुष्काळाचे संकट श्री गणरायाच्या आशीर्वादाने संपावे अशी प्रार्थना सर्वच नेत्यांनी यावेळी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.