प्रतिष्ठा न्यूज

असळज मध्ये १२ सप्टेंबर रोजी महाआरोग्य मोफत तपासणी शिबीर

प्रतिष्ठा न्यूज : तुकाराम पडवळ
गगनबावडा : अथायू हॉस्पिटल कोल्हापूर व मोरे मालक कृषी पर्यटन केंद्र असळज(ता.गगनबावडा) यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे, शिबिरात ह्रदयविकार ,हाडाचे विकार, किडनी विकार, मूत्रविकार, कॅन्सर विकार, मेंदू व मणका विकार याची तपासणी करण्यात येणार आहे. शिबीर मध्ये सहभागी रुग्णांना पुढील उपचार अथायू हॉस्पिटल मध्ये होणार आहेत.हॉस्पिटल कडून पुढील उपचार साठी मोफत बस सुविधा, नातेवाईक राहन्याची सोय  करण्यात येणार आहे. शिबीर मध्ये येताना पिवळे,केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत असणे आवश्यक. या शिबीर मध्ये पुढील उपचार अँजिओग्राफ़ी, अँजिओप्लास्टी, बायपास, हाडाचे फ्रॅक्चर,दुर्बिणीद्वारे गुडघा लिगामेंट ऑपेरशन, दुर्बिणीद्वारे मुतखडा व प्रोस्टेट ऑपेरशन, कॅन्सर ऑपेरशन मोफत करण्यात येणार आहेत.शिबीर दिनांक  १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत मोरे मालक कृषी पर्यटन केंद्र असळज कॅन्टीन येथे असून नाव नोंदणी  *८९२८७३६९९९*  या नंबरवर करावी. तरी जास्तीत जास्त रुग्णांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे मुख्य कार्य.अधिकारी कॅन्सर तज्ञ डॉ. बसवराज कडलगे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.