प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक-शिक्षिका हे आईच्या भूमिकेतून शाळेतील विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचे काम करतात- कामाजी पाटील

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : शिक्षकांना समाजात प्रतिष्ठेचे स्थान असून शिक्षक हा शैक्षणिक मूल्यांच्या आधारे बाल मनावर चांगले संस्कार घडविण्याचे काम करतात असे मत गावातील सामाजिक कार्यकर्ते मा. कामाजी पाटील कदम यांनी व्यक्त केले.
लोहा तालुक्यातील डेरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि.5 सप्टेंबर “डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन” यांचा जन्म दिवस “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला. प्रारंभी “डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन” यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलतांना- कामाजी पाटील म्हणाले की भारतीय संस्कृतीत आई वडील यांच्या नंतर भूतलावर गुरूला महत्त्वाचे स्थान आहे. आई जशी लहान मुलांवर संस्कार करते तसे शिक्षक-शिक्षिका विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या माध्यमातून चांगले संस्कार देऊन भावी नागरिक घडविण्याचे काम करतात असेही ते म्हणाले.
यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षक-शिक्षिका यांच्या विषयीच्या आपल्या चांगल्या भावना व्यक्त केल्या, तसेच विद्यार्थ्यांनी शाळेतील आपले आदर्श शिक्षक-शिक्षिका- राज्य पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक- पंडितराव पवळे, उत्तमराव क्षीरसागर, अंजली भंडे, मनिषा पवार, दिपाली सनपूरकर, सारीका बोधनकर,  यांचा शिक्षक दिनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कु.भक्ती कदम यांनी केले मानले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.