प्रतिष्ठा न्यूज

तासगाव शनी मंदिर जवळील मुतारी काढा… पालिकेला निवेदन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नाट्यगृहा शेजारी असणाऱ्या शनी मंदिर समोरील प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर असणारी सार्वजनिक मुतारी आणि जोशी गल्ली,नागराज गल्ली, गणपती मंदिर रोड,गुरुवार पेठ येथून ये जा करण्यासाठी असलेल्या प्रचंड रहदारीच्या रस्त्यावर पूर्वी पासून असलेल्या शौचालायची सध्या दुरावस्था झाली आहे.दरवाजे नसल्याने त्याठिकाणी दुर्गन्धी सुटून घाणीचें साम्राज्य पसरले आहे.ये जा करणाऱ्या नागरिकांना याचा भयानक त्रास होत असून याठिकाणी डासांचे प्रमाण वाढले असून,लोकांचे आरोग्य धोक्यात आले असून,साथीच्या रोगाचे प्रमाण वाढले आहे.शौचालय शेजारी देशी दारूचे दुकान असल्याने त्याठिकाणी येणारी माणसे शौचालय खराब असल्याने रस्त्यावरच घाण करताना दिसून येत आहेत.याबाबत वारंवार पालिकेला तोंडी आणि लेखी सांगूनही कारवाई होत नसल्याने आज भाजपाचें माजी पक्षप्रतोद अनिल कुत्ते व अरुण साळुंखे यांनी नगरपालिका प्रशासनास निवेदन देऊन येत्या 5 जानेवारी पर्यंत शौचालय,आणि मुतारी पाडण्यात यावी अन्यथा उपोषणाचा इशारा दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.