प्रतिष्ठा न्यूज

तासगावात गुरुजीं कें सम्मान में हिंदू मैदान में!! तासगाव येथे भिडे गुरुजींच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गुरुजी कें सम्मान मे हिंदू मैदान मै म्हणत आज धारकऱ्यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी यांच्या समर्थनार्थ शिवतीर्थ येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव तालुका यांचे वतीने गुरुजींच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.यावेळी ध्येयमंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हणून धारकऱ्यांनी गुरुजींवर करण्यात आलेले आरोप आणि दाखल करण्यात आलेले गुन्हे हें चुकीचे असून,आम्ही सर्व धारकरी गुरुजींच्या विचाराने नवी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रक्त गटाची पिढी तयार होण्यासाठी प्रयत्न करत आहोत,हें काही विघ्न संतोषी माणसांना बघवत नसावे म्हणून गुरुजींवर आरोप करून त्याना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे असा आरोप केला.महात्मा गांधी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने भिडे गुरुजी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत.काही पक्षांकडून भिडे गुरुजी यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.परंतु भिडे गुरुजी जे बोलले तो पुस्तकातील संदर्भ असून तो फक्त गुरुजींनी वाचून दाखवला आहे, त्यामुळे गुरुजींवर होणारी कारवाई ही राजकीय आकसापोटी असून,भिडे गुरुजींच्या कार्याचा आणि त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे काही राजकीय मंडळी भिडे गुरुजींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.त्यामुळे अशा प्रवृत्तींचा निषेध म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव च्या वतीने आज *गुरुजी के सम्मान में हिंदू मैदान मे* म्हणत धारकऱ्यांनी एकत्र येऊन शिवतीर्थवर गुरुजींना पाठिंबा दर्शवीला.
यावेळी गुरुजींच्या आदेशानुसार १५ ऑगस्ट रोजी होणारी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा तासगांव तालुक्यातील प्रत्येक गावोगावी व तासगाव शहरात मोठ्या प्रमाणात काढण्याचा निर्धार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,तासगांव यांच्या वतीने करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.