प्रतिष्ठा न्यूज

डॉ. जाधव महाविद्यालयात वाचन कट्ट्याचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : केवळ पाठ्यपुस्तके वाचून परीक्षेतील अपेक्षित प्रश्नांची उत्तरे लिहिल्याने खरे शिक्षण पूर्ण होत नाही. म्हणूनच त्याला अवांतर वाचनाची मजबूत जोड द्यायला हवी. त्यासाठी विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करणे आवश्‍यक असल्याने  डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात  “वाचन कट्टा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन आनंदी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सतिश देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव व प्रभारी प्राचार्य डॉ व्ही एस पाटील होत्या.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नॅक समन्वयक डॉ. एस.एस. पानारी यांनी केले,  एनएसएस  समन्वयक प्रा ए एस कांबळे यांनी आभार मानले.तर प्रा.डी के पाटील  यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळेस प्रा एच एस फरास, प्रा घाटगे एस एस, प्रा.सरनोबत आर आर प्रा. पुजारी यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.