प्रतिष्ठा न्यूज

शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा संचालक-अंबुलगेकर व सेवानिवृत शिक्षक- रक्षाळे-राठोड-पाटील-बेळगे यांचा सत्कार संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : शिवसेना प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखा देगलूरच्या वतीने शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सहकारी पतसंस्था नांदेड येथे संचालक म्हणून निवडून आलेले- संतोष आंबुलगेकर, व नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले शिक्षक- मारोती रक्षाळे, व्यंकटराव राठोड, संग्राम पाटील, बाबुराव बेळगे,यांचा सत्कार दि 11 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा परिषद हायस्कूल देगलूर येथे मुलांच्या शाळेतील सभागृहात शिवसेनेचे तालुकाप्रमुख- मा. महेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी शिवसेना देगलूर मतदारसंघ संघटक- राजेंद्र इंगळे, युवा नेते- बालाजी पाटील इंगळे, तालुका संघटक- बसवंत पाटील गाडले, शिवसेना उपशहरप्रमुख- संजय‌‌‌ण्णा जोशी, उपतालुकाप्रमुख तथा लोणीचे उपसरपंच- मानाजी लोणे पाटील, युवा सेना तालुका प्रमुख- संतोष जाधव, युवा सेना तालुका समन्वयक तथा सोशल मीडिया तालुका प्रमुख- भागवत पाटील, बालाजी चोपडे, सोयलभाई, आदी शिवसेना, व युवा सेना पदाधिकारी तसेच राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक- एन टी शिंदे, केंद्रप्रमुख- बालाजी मामडे ,पदोन्नत मुख्याध्यापक- गोपछडे, तोटरे, सावळे, पाटील के.सी.व पी.आर.टोके, आदी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तर शिक्षक सेनेचे पदाधिकारी देशटवाड, चिद्रावार, सुवर्णकार,भंडेवार, आलेटवाड, मोतेवार, राजुरवार, अन्नमवार, बिरादार,सिंगणवाड, देशपांडे, बेजगमवार, बल्लाळ, वंटगिरे, ढवळे, वल्लेमवाड, सुरनर, टी.एम पवार, तसेच जुनी हक्क पेन्शनचे संघटनेचे तालुका अध्यक्ष- संतोष शिंदे,भगवान पाटील झरीकर, शिक्षक सेनेचे जिल्हा नेते गंगाधर ढवळे, राजुरे आकाश, घटकार, आदी मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक, या कार्यक्रमास उपस्थित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश चिद्रावार यांनी केले, तर आभार प्रदर्शन डीसीपीएसचे जिल्हा समन्वयक- गोविंद यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.