महाराष्ट्र भुषण पुरस्कार तात्काळ मागे घ्या : संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष युवराज शिंदे
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : संभाजी ब्रिगेड च्या वतीने सांगली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात येणारा महाराष्ट्र भुषण पुरस्कार तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आप्पासाहेब धर्माधिकाऱी यांना दिलेल्या पुरस्काराचा जाहीर निषेध केला. कारण त्यांचं काम महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्या येवढ मोठे नाही. असे महानगराध्यक्ष युवराज शिंदे म्हणाले. यावेळी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा रेखा पाटील, शहर महिला आघाडी अध्यक्षा भारती पाटील, सचिव जितेंद्र भोसले उपस्थित होते.