प्रतिष्ठा न्यूज

युवकांनी महापुरुषांचा वारसा पुढे चालवून देश बळकट करावा” प्रा. कुंडलिक जाधव

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : “युवकांनी महापुरुषांचा वारसा पुढे चालवून देश बळकट करावा” म. ह. शिंदे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिरामध्ये ते बोलत होते. गगनबावडा तालुक्यातील धुंदवडे येथे 6 जानेवारी पासून हे शिबीर सुरू आहे. ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव: ध्यास नवा श्वास नवा’ या विषयावर प्राध्यापक जाधव यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी स्वातंत्र पूर्व काळातील इतिहासाला उजाळा देऊन स्वातंत्र्याच्या पंचाहत्तर वर्षांत भारतात झालेल्या स्थित्यंतराचा उलगडा केला. पुढील पंचवीस वर्षात देशासमोरील आव्हाने असून युवकांनी देशकार्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुंदवडे गावच्या उपसरपंच प्रियांका पाटील उपस्थित होत्या.
यावेळी म.ह. शिंदे महाविद्यालयाचे पिंजरकर , पोवार आणि तरुण, तरुणी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.