प्रतिष्ठा न्यूज

इटग्याळ येथील जेष्ठ नागरिक माधवराव देवराव पाटील अतनुरे यांचे निधन

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड प्रतिनिधी : मुखेड तालुक्यातील इटग्याळ (प मु ) येथील जेष्ठ नागरिक तथा श्रीमती विठाबाई शिक्षण प्रसारक मंडळ इटग्याळ (प मु) चे अध्यक्ष माधवराव देवराव पाटील अतनुरे यांचे वयाच्या 90 व्या वर्षी आज दि.13 डिसेंबर 2022 रोजी दुःखद निधन झाले असून त्यांच्यावर उद्या दि.14 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 1 वाजता मूळ गाव इटग्याळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अतिशय शिस्तप्रिय, सामाजिक जाण व शिक्षण तसेच शेतीची आवड असलेले कै. माधवराव पाटील अतनुरे यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, सुना नातु पणतू असा मोठा परिवार आहे.
ते शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक संजय अतनुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेंबोली, तालुका मुदखेड येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक अरुण अतनुरे, जिल्हा परिषद केद्रिय प्राथमिक शाळा दापका येथील मुख्याध्यापक लक्ष्मण आतनुरे, अनिल अतनुरे यांचे वडील होते.
प्रतिष्ठा न्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली…

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.