प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्हा येथे महिला काँग्रेसचे” खर्चे पे चर्चा अभियान “

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नेत्या श्रीमती सोनियाजी गांधी,अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा अलकाजी लांबा , तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा आदरणीय संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार सांगली जिल्हा महिला काँग्रेस वतीने आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई सांगली येथे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील यांच्या नेतृत्वाखाली

” खर्चे पे चर्चा “हा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, कुटुंबाचे घटलेले उत्पन्न, या सर्व बाबींवर मंडई मधील व्यापारी, ग्राहक यांचे बरोबर चर्चा करण्यात आली. या चर्चे

मध्ये ग्रामीण व शहरी महिलांनी महिलांनी आपला खूप सहभाग नोंदवला. व आम्हाला 1500 नको महागाई कमी करा, आमच्या मालाला हमी भाव द्या, आमच्या मुलांना रोजगार द्या, जुने दिवस परत द्या अशा अपेक्षा व्यक्त केल्या. या कार्यक्रमास सांगली शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा करुणा सॅमसन, जिजाऊ ब्रिगेड महिला मंडळाच्या आशा पाटील, माजी सरपंच कविता बोंद्रे, माजी सरपंच शोभा चव्हाण, माजी नगरसेविका शुभांगी साळुंखे , कविता नागे, अनुराधा पाटील, शुभांगी कांबळे,आरती गुरव, शमशादबी नायकवडी, शोभा विधाते, एस्तर कोनेसागर, सुमन कांबळे आदी महिला पदाधिकारी, भगिनी उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.