प्रतिष्ठा न्यूज

सोशल मीडियावर स्टेटस ठेवून नंदीग्राम एक्स्प्रेसखाली प्रेमीयुगुलाची आत्महत्या : एकमेकांना घट्ट धरून रेल्वेसमोर मारली उडी

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : आदिलाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या नंदीग्राम
एक्स्प्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाने एकमेकांना घट्ट
मिठी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवार दिनांक 11 नोव्हेंबर दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास भोकर रेल्वेगेट नंबर 9 वर घडली आहे.
भोकर तालुक्यातील मौजे रिठ्ठा येथील आयटीआय पास झालेली धारा माधव मोरे वय 21 वर्षे  व भोकर येथील शिवराज मनोज क्यातमवार वय 22 वर्षे रा. गांधी चौक, यांचे एकमेकांवर प्रेम होते. शुक्रवारी दिनांक 11 नोव्हेंबर 2022 रोजी दोघेही सोबत फिरत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. टोकाचे पाऊल उचलण्या संदर्भात दोघांनी आपआपल्या मोबाईल वर स्टेटस ठेवल्याचे त्यांच्या ओळखीच्या लोकांनी सांगितले.
दुपारी आदिलाबाद-मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस भोकर
रेल्वे गेटजवळ येताच दोघांनी रेल्वेसमोर उडी घेतली.
प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार रेल्वे जवळ येत असताना धारा ही शिवराजला पटरीच्या जवळ न जाता बाजूला जाण्यास सांगत होती. परंतु शिवराजने तिचे ऐकले नाही.तिला घट्ट पकडल्याने दोघांना रेल्वेची जोरदार धडक बसली व त्यांचा जागीच मृत्यू झाला.
यावेळी बघ्यांची खुपच गर्दी जमली होती. सदर माहीती पोलिसांना मिळताच ते या ठिकाणी दाखल झाले व पुढील कारवाई केली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.