प्रतिष्ठा न्यूज

ज्ञानेश्वरी प्रायमरी सेकेंडरी ईंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी सेकेंडरी ईंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातून बाजी मारत सलग तिसऱ्या वर्षीही 100 % निकालाची परंपरा कायम ठेवत या शाळेचे पहिले तिन्हीही विद्यार्थी कु.श्वेता राजेश्वर वडवळे हीने 500 पैकी 474 गुण घेऊन सरासरी 94.80% गुण घेऊन श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कापसी गुंफा या केंन्द्रातून व ज्ञानेश्वरी या शाळेतून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर कु.प्रिती दिगंबर ढेपे हीने 500 पैकी 470 गुण घेऊन सरासरी 94.00 % गुण घेऊन केंन्द्रातून व ज्ञानेश्वरीतून द्वितीय येण्याचा मान मिळवला. तसेच कु. दिपाली ज्ञानेश्वरउबाळे 500 पैकी 456 गुण घेऊन सरासरी 92.20 %गुण घेत केंन्द्रातून व ज्ञानेश्वरीतून तृतीय येण्याचा मान मिळविला आहे. श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कापसी गुंफा या केंन्द्रातून एकून पाच शाळांचे सुमारे 318 विद्यार्थ्यांना एसएससी बोर्ड परीक्षा दिली.
यावेळी केंद्राधिकारी- एस.एस. कोंडलवाडे यांनी यशस्वी कामगिरी बजावली. अनुक्रमे- 1) श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कापसी गुंफा-(91.47%) 2)श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कापसी बु- (83.33%) 3)श्री संत बाळगीर महाराज हायस्कूल कहाळा खु- (87.50%) 4) किसान विद्यालय उमरा-(85.71%) निकाल लागला वरील चारही शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. तर (5) ज्ञानेश्वरी प्रायमरी सेकेंडरी ईंग्लिश स्कूल मारतळा या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा (100%) निकाल लागला आहे.या यशा बद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्याध्यापक- संजय पाटील ढेपे, शिक्षक व पालक यांनी सर्वांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिक्षक- श्रीराम ढेपे, विलास गोणारे, पुरूषोत्तम जोशी, प्रकाश तारू, प्रिया सामला, कान्होपाञा तिरमाले, आम्रपाली पोहरे, चांगुणा भरकडे, स्वाती कपाळे, रूपाली कुलकर्णी, संजीवनी साखरे, नम्रता वाघमारे, सुनिल तारूआदी सह पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.