प्रतिष्ठा न्यूज

महिला स्वावलंबी योजना राबविणेसाठी रोटरी, लायन्स, जायंट्स सहकार्य देणार १००० महिलासाठी स्वयंरोजगाराची संधी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : स्नेहजित प्रतिष्ठानच्या महिलांना स्वयंरोजगारासाठीच्या स्वावलंबी योजना अंमलबजावणीत रोटरी, लायन्स व जायंट्स या तिन्ही संस्था सहकार्य करतील, अशी ग्वाही सांगलीतील समारंभात देण्यात आली. कुपवाडमधील स्नेहजित प्रतिष्ठान व स्टेप अप वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या वतीने एक हजार महिलांना स्वयंरोजगारासाठी थेट निधी देण्याचा समारंभ सांगलीत भावे नाट्य मंदिरात झाला. रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला, जायंटस् वेलफेअर फौंडेशन अध्यक्ष गिरीश चितळे, लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे प्रमुख पाहुणे होते.
भारतमाता प्रतिमा पूजनाने समारंभाची सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक स्नेहजितचे अध्यक्ष सन्मती गौंडाजे यांनी केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी स्वावलंबी योजनेचा फायदा करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
स्टेप अप वुमनचे प्रोजेक्ट इनचार्ज प्रशांत माने यांनी एप्रिल 2022 पासून एक हजारहून अधिक महिलांनी योजनेत नोंदणी केलेली आहे. त्यातील महिलांना प्रातिनिधिक स्वरुपात मदत वितरित केली जात असल्याचे सांगितले. दुसऱ्या टप्प्यात महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
नासिर बोरसादवाला यांनी महिला सबलीकरण स्वावलंबी योजनेत इनरव्हील व रोटरी सदस्य हातभार लावतील असे सांगितले. गिरीश चितळे यांनी जायन्ट्स सर्वोतोपरी सहकार्य करेल असे स्पष्ट करून संयोजक स्नेहजित प्रतिष्ठानला महिलांनी मदत करावी, असे आवाहन केले. लायन्स डिस्ट्रिक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे यांनी स्नेहजित प्रतिष्ठानचा स्वावलंबी योजना उपक्रम राबविल्याबद्दल विशेष प्रमाणपत्र देऊन गौरव केला. लायन्स योजना सर्वत्र पोहोचवेल, असे त्यांनी सांगितले.
विवेक टेंगले, अजित पाटील, विजय वाघमारे, माधुरी वसगडेकर, माया गडदे, सुनिता बने, श्रावणी सौंदत्ते, भाग्यश्री पाटील, हेमश्री पाटील,श्रीकांत सुतार, वैशाली खटके, प्रमोद माने, आकाश पाटील, राजेंद्र पाचोरे, प्रवीण कुंभोजकर यांचा योजनेत सहभाग दिल्याबद्दल गौरव करण्यात आला.
कलावती संभाजी जाधव, वैशाली बाळासो बिराजदार, उज्ज्वला सुनील कांबळे, रुपाली विजय कागले याना वैयक्तिक भांडवल मदतीचे धनादेश देण्यात आले. रेखा संजय सुतार, आशा अधिकराव पाटील, पद्मावती रावसाहेब कोळी, हेमा सूर्यकांत कोरे, स्नेहल शीतल वनुगरे, आक्काताई बापू माने,रिनाज हसीम शेख यांना प्रातिनिधिक स्वरूपात शिलाई यंत्र देण्यात आले.
ग्रामीण विकास संस्था (कोसारी), बहुजन विकास सोसायटी,(वालेखींडी), जनक्रांती बहुद्देशीय सेवाभावी संस्था (सांगली),श्री समर्थ कृपा बहुउद्देशिय सेवा भावी संस्था (मौजे डिग्रज), स्वयंसिद्धा संस्था, (बुधगाव), आपतकालीन सेवा संस्था (रेठरे धरण) या संस्थाना समूह प्रकल्प करण्यास पाहुण्यांच्या हस्ते मान्यता पत्र देण्यात आले. प्रवीण कुंभोजकर यांनी आगामी काळातील नोंदणीसाठी विशेष तयार केलेल्या ॲपची माहिती दिली. बाळासाहेब कलशेट्टी, स्नेहल गौंडाजे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतिष्ठानचे सचिव श्री. गौंडाजे यांनी आभार मानले. विशाल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कुमार केंपवाडे, दिनकर लोकरे, बाळासाहेब दानोळे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.