प्रतिष्ठा न्यूज

तासगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनकडून जल्लोष

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : लोकसभा निवडणुकीत एनडीए प्रणित आघाडीला मिळालेल्या बहुमताच्या जोरावर काल भारताचे पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली.दिल्लीत मोठ्या दिमाखात शपथ ग्रहण सोहळा सुरु असताना संपूर्ण देशभरात भाजपासह हिंदुत्ववादी संघटनानी जल्लोष साजरा केला.पंतप्रधान मोदी यांचा शपथ विधी सुरु असताना तासगावातील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून जय श्री राम च्या घोषणा दिल्या.
देशातील लोकसभा निवडणूक निकाला नंतर एनडीए कडून केंद्रात सत्ता स्थापन करण्यात आली.यावेळी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ ग्रहण केली त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथ ग्रहण समारंभ पार पडत असतानाचा आनंद साजरा करत तासगाव शहरातील नरेंद्र मोदी समर्थकानी आपापल्या गल्लीत फटाक्यांची आतषबाजी केली.यावेळी शिवतीर्थावर श्री शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी एकवटत जल्लोष साजरा केला.यावेळी उपस्थितांना पेढे वाटप करण्यात आले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.