सांगली जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या खासदार संजयकाकांची चिंचणी ग्रामपंचायत बिनविरोध : सरपंचपदी सदाशिव माळी यांची निवड
प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खासदार संजय काका पाटील यांच्या चिंचणी गावची ग्रामपंचायत अखेर बिनविरोध झाली. आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात अर्ज भरलेल्या इच्छुकांनी नेत्यांच्या आदेशावरून अर्ज माघार घेऊन ग्रामपंचायत बिनविरोध सकरून जिल्ह्यासमोर एक आदर्श ठेवला आहे. खासदार संजय काका पाटील आणि राष्ट्रवादीचें जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील यांनी सर्वसमावेशक उमेदवारांना संधी दिल्याने तसेच चिंचणीचें ग्रामस्थ एकमताने दोन्ही नेत्यांच्या पाठीशी राहिल्याने ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याचे बोलले जात आहे. चिंचणी च्या ग्रामस्थांनी निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर एकत्रित येऊन गावच्या विकासासाठी पक्षीय झेंडे, अजेंडे बाजूला ठेवून हि निवडणूक दोन्ही काकांनी एकत्रित येऊन बिनविरोध साठी प्रयत्न केले. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावाच्या एकोप्याला कुठे बाधा लागू नये, गावात सलोख्याचे वातावरण रहावे यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला.
सरपंचपदी सदाशिव भाऊ माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बिनविरोध सदस्य खालीलप्रमाणे..
संध्या सुरेश राजमाने, सुनिता सुभाष शिंदे, पंढरीनाथ विलास पाटील, सुवर्णा संतोष गवळी, दिपाली पोपट वाघमोडे, स्वप्नील महादेव पाटील, नवनाथ तुकाराम गवळी, भागवत सोपान जाधव, मनोज मदन गुरव,वर्षा हरिश्चंद्र जाधव, राधिका सुधिर टेके, अश्विनी अरुण पाटील, उषा उदयकुमार शिंदे, भानुदास रामचंद्र पाटील, सचिन मोहन पाटील, शारदा विलास पाटील, विशाल सुभाष जाधव