प्रतिष्ठा न्यूज

कॅफेच्या नावाखाली चालतात मिनी लॉज : ‘शिवप्रतिष्ठान युवा’तर्फे आयुक्तांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज

सांगली प्रतिनिधी : कॅफेच्या नावाने खुलेआम लॉजसारखा व्यवसाय शहरात सुरू आहे. केबिन, कंपार्टमेंटस् अन् बेडची व्यवस्था करण्यात येत असल्याने अश्लील व्यवहारांना चालना दिली जात आहे. त्यामुळे परवाना न घेता किंवा परवाना घेऊन वेगळ्या पद्धतीने कॅफे चालविणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली.

आयुक्त शुभम गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी म्हटले आहे की, महापालिका क्षेत्रात बेकायदेशीरपणे काही कॅफे चालू आहेत. मुला-मुलींना अश्लील वर्तनासाठी कंपार्टमेंटस् व पार्टी हॉल उपलब्ध करून दिले जातात. काही अंधाऱ्या खोलीत तासाला २०० ते ३०० रुपये घेऊन बेड उपलब्ध करून दिले जातात. गेल्या एक वर्षापासून प्रतिष्ठानमार्फत या कॅफेविरोधात जनजागृतीचे काम सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदन दिले होते. त्यांनी तातडीने परिपत्रक काढून महाराष्ट्रात कारवाईचे आदेश दिले आहेत. तरीही अशा प्रकारचे कॅफे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. प्रतिष्ठानच्या प्रतिनिधींनी आत जाऊन गैरप्रकारांची खात्री केली आहे. त्यामुळे त्यांनी बेकायदेशीर व्यवसाय सुरू ठेवला असल्याने महापालिकेने त्यांचा परवाना रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.