शांतताप्रेमी तालुक्याचा लौकिक वाढवावा : स.पो.नि ज्ञानेश्वर वाघ
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गणेश उत्सव हा आनंदाचा उत्सव असून त्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेऊन सर्वांनी गणेशोत्सव शांततेच्या मार्गाने साजरा करावा, डॉल्बी मुक्त व पर्यावरण युक्त, पारंपारिक वाद्यांचा वापर करून शांतताप्रेमी तालुक्याचा लौकिक वाढवावा. असे आवाहन गगनबावडयाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाघ यांनी केले.गगनबावडा पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सदस्य गावातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सर्व पोलीस पाटील यांना आमंत्रित केलेल्या सैतवडे येथील बैठकीत बोलत होते.
बैठकीत भास्कर माने, विशाल पडवळ ,पांडुरंग सावंत,मंगेश सुतार, मंगेश प्रभू, तोरस्कर,पोलीस पाटील संजय वरेकर, नंदकुमार कांबळे आदी ग्रामस्थ हजर होते.