प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिका आणि प्रदूषण मंडळाकडून सिंगल युज प्लास्टिक वापरण्यावर कारवाई सुरू : 2 आस्थापना आणि 18 फेरीवाले यांचेकडून 20800 इतका दंड वसूल

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महापालिकेकडून गुरुवारी सिंगल युज प्लास्टिक वापरण्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महापालिका स्वच्छता निरीक्षक आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी सांगलीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी शशिकांत लोखंडे दाखल झाले आहेत. या कारवाईत 2 आस्थापना आणि 18 फेरीवाले यांचेकडून 20800 इतका दंड वसूल करण्यात आला.
सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात बाजारपेठेतील अनेक आस्थापना मध्ये प्लास्टिक विक्री आणि वापर होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून बाजारपेठेत शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपआयुक्त राहुल रोकडे आणि स्मृती पाटील यांच्या सूचनेनुसार प्लास्टिक विक्री आणि वापर करणाऱ्यावर कारवाईला सुरवात केली आहे. गुरुवारी महापालिका स्वच्छता निरीक्षक आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्लास्टिक जप्तीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यासाठी सांगलीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी शशिकांत लोखंडे दाखल झाले आहेत. यावेळी संयुक्त पथकाने मारुती रोड, बालाजी चौक, गणपती पेठ आदी मार्गावर अनेक दुकानांची तपासणी करीत सिंगल युज प्लास्टिक वापरले किंवा विकले जात असल्याची माहिती घेतली. यावेळी अनेक आस्थापनामध्ये सिंगल युज प्लास्टिक आढळून आल्याने संयुक्त पथकाने असे प्लास्टिक जप्त करीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रतिनिधी शशिकांत लोखंडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सांगली विभागाचे क्षेत्र अधिकारी रवी मातकर, महापालिकेचे वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर , स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, धनंजय कांबळे, प्रनिल माने, अंजली कुदळे, कोमल कुदळे, राजू गोंधळे, गणेश माळी, वैभव कुदळे, अतुल आठवले, किशोर कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.