प्रतिष्ठा न्यूज

तासगाव हर्षरूप सेवा प्रतिष्ठानच्या गौरी आरास कार्यक्रमाच्या निमित्ताने आम.सुमनताई आणि ज्योतीताई पाटील एकत्र

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : हर्षरूप पैठणी व हर्षरूप सेवा प्रतिष्ठान तासगाव अंतर्गत भव्य गौरी आरास स्पर्धेचे आयोजन संपूर्ण तासगावकरां साठी करण्यात आले होते.तसेच गौरी आरास स्पर्धा ऑनलाइन ही घेण्यात आल्या होत्या,त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी सहभाग घेतला.यावेळी नृत्य,खेळ पैठणी भाग्यविजेत्याचा, मंगळागौर,आणि भव्य mrs tasgaon 2023 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुमनताई आर पाटील,आणि प्रमुख पाहुणे वैजयंता फाउंडेशनच्या अध्यक्ष ज्योतीताई पाटील उपस्थित होत्या.या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार सुमनताई आणि ज्योतीताई पाटील या दोघीनी एकत्र येऊन कार्यक्रमात एकमेकिंशी सवांद साधला.यावेळी झालेल्या गौरी आरास ऑनलाइन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पुणे,द्वितीय क्रमांक सातारा,तसेच तृतीय क्रमांक पलूसचा आला.तासगावमधून या स्पर्धेत 30 महिलांनी सहभाग घेतला होता.त्या सर्व स्पर्धकांच्या घरी जाऊन परीक्षण करण्यात आले होते.हे परीक्षण हर्षरूप सेवा प्रतिष्ठानच्या संस्थापिका सौ.तृप्ती संदीप पाटील तसेच सैनिकी शाळेचे कलाशिक्षक श्री कलासागर सर,सौ.अश्विनी जाधव यांनी केले.परीक्षण हे अत्यंत पारदर्शक करण्यात आले.सर्व गौरी आरास हे इंस्टाग्राम harshrup trupti वरती लाईव्ह दाखवण्यात आले.गौरी आरास स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकास हर्षरूप पैठणी,चांदीची मूर्ती सन्मानचिन्ह,द्वितीय क्रमांकास हर्षरूप पैठणी,सन्मान चिन्ह व तृतीय व चतुर्थ क्रमांकास हर्षरुप पैठणी व सन्मान चिन्ह,पाच ते दहा क्रमांकास सन्मान चिन्ह,भेटवस्तू व उर्वरित सर्व सहभाग घेणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
गौरी आरास स्पर्धा विजेते..
1)दिपाली भुजबळ
2) प्रिती शिंदे
3) प्रियांका हिंगमिरे
3) सुनिता गायकवाड
यावेळी झालेल्या Mrs Tasgaon 2023,व नृत्य स्पर्धेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.अनेक स्पर्धकांनी यावेळी उत्स्फूर्त सहभाग घेतला.प्रथम क्रमांकास हर्षरूप पैठणी चांदीची मूर्ती,सन्मान चिन्ह,दुसऱ्या क्रमांकास हर्षरूप पैठणी, सन्मानचिन्ह,तिसऱ्या क्रमांकास हर्षरूप पैठणी सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी झालेल्या Mrs.Tasgaon 2023 स्पर्धेत
प्रथम क्रमांक.डॉ.प्रियवंदा जाधव
द्वितीय सौ.लक्ष्मी सावंत
तृतीय सौ.शितल पाटील (ढवळी)
तृतीय सौ.निपानिकर..
नृत्य स्पर्धा विजेते
1) सौ.मंजुश्री कांबळे
2) सौ.वनिता जमदाडे
सौ.संगीता जाधव
3) कू.वृषाली धाबुगडे
सौ.वैष्णवी जाधव
4) सौ.राखी कचरे..
सर्व विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.