प्रतिष्ठा न्यूज

विद्यार्थी दशेतच वाहतूक सुरक्षेचे महत्त्व सांगणे गरजेचे : अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर ; सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित रेझिंग डे कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 5 : लहान विद्यार्थी भविष्यात देशाचे सुजाण नागरिक बनणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी दशेतच त्यांना वाहतूक सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी आज येथे केले.

महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित रेझिंग डे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी पोलीस उपाधीक्षक (गृह) डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक (वेल्फेअर) अजित सिद, पोलीस निरीक्षक (वाहतूक) मुकुंद कुलकर्णी, वाहतूक सुरक्षा दलाचे उपमहासमादेशक अनिल शेजाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक माणिकलाल पवार, मुख्यालय ड्रील इन्स्ट्रक्टर अशोक कोळी तसेच विविध शाळेतील ३०० हून अधिक आरएसपी बालसैनिक विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक – शिक्षिका उपस्थित होते.

बालसैनिकांना वाहतूक सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून मोठे यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या हा कार्यक्रमात पोलिस वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस विभागाची रचना कार्य यांचा आढावा घेण्यात आला.

पोलीस निरीक्षक अजित सिद यांनी स्पर्धा परीक्षेतून पोलीस अधिकारी कसे बनतात याची माहिती देत मार्गदर्शन केले. डॅनियल बेन यांनी बालसैनिकांना रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी वाहतूक साक्षरता अंगी बाळगावी, असे स्पष्ट केले. अनिल शेजाळे यांनी वाहतूक चिन्हांची ओळख प्रश्नोत्तराच्या रुपाने घेतली. अशोक कोळी यांनी साईन बोर्डची माहिती तसेच पादचारी दिशा व त्याबद्दल जनजागृती केली. सर्व आरएसपी बालसैनिकांना पोलीस मुख्यालयातील विविध शाखांतील कामाचे स्वरूप, माहिती, विविध शस्त्रास्त्रांची माहिती यांच्यासह बालसैनिकांना श्वानपथक प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
अनिल शेजाळे यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.