प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत महात्मा गांधींना कॉंग्रेस तर्फे अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्टेशन चौक, सांगली येथील महात्मा गांधी यांच्या पुर्णकृती पुतळ्यास सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने ज्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, महात्मा गांधीजींच्या शिकवणुकीची आणि योगदानाची ताकद अजोड आहे. ही ताकद आपण सर्वांनी आत्मसात केली तर जगण्याचा खरा अर्थ काय हे नक्कीच कळेल. महात्माजींनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जपलेली तत्त्वे ही वैश्विक होती. सामान्य जनता सुखी राहावी, प्रत्येक भारतीय अभिमानाने जगावा यासाठी ते अविरत कष्ट करीत राहिले. त्या कष्टाचे पाईक होण्याची ताकद अंगी येऊ दे.

या कार्यक्रम प्रसंगी मालनताई मोहिते, रविंद्र वळवडे, अॅड. भाऊसाहेब पवार, अमित पारेकर, वसीम रोहिले, पैगंबर शेख, विक्रम कांबळे, अजित ढोले, बाबगोंडा पाटील, अशोक मालवणकर, महावीर पाटील, राजेंद्र कांबळे, आयुब निशानदार, भिमराव चौगुले, प्रकाश माने, सुरेश गायकवाड, अरूण धोतरे, विश्वास यादव, शिवाजी पाटील, कांचन खंदारे, जन्नत नायकवडी, शमशाद नायकवडी, रामचंद्र पवार, नंदाताई कोलप, श्रीधर बारटक्के, सीमा कुलकर्णी, आरिफ मालगावे, वैषाली गद्रे, सुचेरा कुलकर्णी, जुबेदा बिजली, श्रीपाद चौगुले, उत्तम सुर्यवंशी, अर्जुन मजले, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.