प्रतिष्ठा न्यूज

फ्युजन डान्स अकॅडमीचा ‘डान्स जत्रा २०२३’ उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली फ्युजन छान्स अकॅडमी आणि नटराज पौडेशन सांगली यांच्या संयुक विद्यमाने मेघा डान्स वर्कशॉपचा डान्स जत्रा २०२३ हा सांगता समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. त्यास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

विष्णुदास भावे नाट्यगृह येथे पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये २०० मुला मुलींसह अपंग, मतिमंद, मूकबधिर अशा मुलांचाही समावेश होता. सुरुवात नटराज पूजनाने झाली. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नंदा पाटील, उद्योजक रमाकांत घोडके, नटराज फौंडेशनचे संस्थापक शशिकांत जाधव, दिग्दर्शक शेखर रणखांबे निसर्वरंग फीडेशनचे संस्थापक कुलदीप देवकुळे, दिग्दर्शक विक्रम शिरतोडे अभिनेते विशाल शिरतोडे, अभिनेते पार्थ घाडगे, अभिनेते फिरोज शेख, अभिनेत्री मोहिनी खोत, विजय देवकर, विनाशिवे, नृत्य दिग्दर्शक महेश पाटील सचिन ठाकर, जयश्री पाटील, अपंग सेवा निर्मला कुलकर्णी आदी मान्यवर लोक उपस्थित होते

फ्युजन डान्स अकॅडमी आणि नटराज फाउंडेशनतर्फे अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी चला हवा येऊ द्या फेम सौ. गौरी वनारसे – वायचळ यांनी संबळ वादन करुन प्रेक्षकांची मने जिंकली. प्रारंभी गणेश वंदना डान्स पार पडली. त्यानंतर शॅडो अॅक्ट, गोंधळ, वेस्टर्न डान्स योगा डान्स, अपंग मुलांचा देशभक्तीपर डान्स यांच उत्कृष्ट सादरीकरण झाले. शेवट ‘कांतारा’ फिल्ममधील पंजुल डान्सने झाला.

यानिमित्ताने अपंग मुलांना मुंबई पोलीस दलातील अभिषेक निकम व सतीश मोसले यांच्या हस्ते यांच्याकडून शैक्षणिक साहित्यांचेही वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन व दिग्दर्शन नृत्य दिग्दर्शक सुरज वाघमोडे यांनी केले. त्यांना सहाय्यक नृत्य दिग्दर्शक संतोष खाडे, सौरभ जतकर, प्रशांत डोरले, किरण नाईक सपोर्ट टीम, सचिन ठाणेकर, कुलभूषण काटे, सागर पाटील, जगन्नाथ साळुंखे, सचिन कांबळे, आकाश शिंदे, आयुब शेख, निखिल पेडणेकर यांची मोलाची साथ लाभली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.