प्रतिष्ठा न्यूज

पूर नियंत्रण करण्यासाठी शासनाशी समन्वयातून आपत्ती तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणार : आमदार सुधीरदादा गाडगीळ; संभाव्य पूर परिस्थिती बाबत आढावा बैठक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पद्मभूषण वसंत दादा पाटील सभागृहामध्ये आज दि १३/६/२०२४ रोजी मा आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आपत्ती व्यवस्थापन बाबत बैठक आयोजित करण्यात आली होती, मा आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांनी महत्वाच्या सूचना या वेळी दिल्या आहेत, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करताना ज्या ठिकाणी निवारा केंद्रात व्यवस्था केली आहे त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, पुरेशी लाईट ,पिण्याचे पाणी, चांगले जेवणाची सोय उपलब्ध करून द्यावी. प्रशासनाने लोकप्रतिनिधी नगरसेवक व सेवाभावी संस्था यांचे प्रामुख्याने सहकार्य घेऊन महापुरामध्ये या सर्वांची प्रशासनास मदत होईल.
शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक यांनी शहरातील ७३ ठिकाणी साचून राहणारे पावसाचे पाणी निचरा करण्यासाठी कायमची व्यवस्था करण्यासाठी राज्य सरकार यांच्या कडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करावे.

यावेळी माजी सन्मा नगरसेविका स्वातीताई शिंदे यांनी गेल्या पुरा मध्ये नागरिकांना समस्या निर्माण झाला होता, त्या वेळी होणार नाही, यांची दक्षता घ्यावी, यांत्रिक बोटीस पुरेसे इंधन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, निवारा केंद्रावर एक अधिकारी हा नोडल अधिकारी या वेळी नेमणूक करावी, समाजातील दाते लोकांची यादी तयार ठेवावी. पुरा नंतर महत्वाची भूमिका महापालिकेची आहे, अन्य सहकार्य करण्याऱ्या नगरपालिका, महापालिका यांना स्वच्छता साहित्य उपलब्ध करून ध्यावे.
माजी सभागृह नेते युवराज बावडेकर यांनी या वेळी आम्ही महापालिकेस सहकार्य करण्यासाठी एकत्रित आलो आहे. पूर क्षेत्रात येणाऱ्या वार्ड मध्ये पूर्व सुचना देऊन रहिवाशी यांना सतर्क करावे, एन डी आर इफ टीम यांना महापालिका वतीने लोकेशन समजण्यासाठी मार्गदर्शन करावे.
पुरा नंतर महापालिका प्रशासनाने चागले काम करावे , मागील पुरा मधील अनुभव वरून या वेळी योग्य नियोजन करावे, मंगल कार्यालय शक्य तितके तात्पुरत्या रहिवास साठी वापर करावा, पुरा नंतर पिण्याच्या पाण्याची सोय करावी, माजी स्थायी सभापती श्री धीरज सूर्यवंशी यांनी आम्ही प्रशासन बरोबर नेहमी असणार आहे, पूर नियंत्रण साठी शासनाच्या यंत्रणेंशी समनव्यातुन काम करावे अशी सूचना नमूद केली आहे, शहाजी भोसले सामाजिक कार्यकर्ते यांनी स्थानिक पातळीवर सामाजिक कार्यकर्ते यांच्या समनव्यातुन काम केले तर पूर परिस्थितीतून नक्की आपण सहीसलामत बाहेर पडू, शामराव नगर महापूरात जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करावे, माजी नगरसेवक सुबराव मद्रासी यांनी देखील आपले मत या वेळी नमूद केले आहे.
अति आयुक्त रविकांत अडसूळ, सहा आयुक्त आपत्ती, नकुल जकाते सर्व विभागाचे अधिकारी तसेच माजी स्थायी समिती सभापती धीरज सूर्यवंशी, माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे, उर्मिला बेलवलकर, रजिया नाईक, माजी सभागृह नेते युवराज बावडेकर, माजी नगरसेवक सुब्राव मद्रासी, संजय यमगर, शिवसेनेचे अमोल पाटील, इम्रान शेख, अशरफ वांकर, विश्वजीत पाटील, अमर पडळकर, रोहित जगदाळे, सुजित राउत, हेमालता मोरे, सुमित शिंदे, प्रथमेश वैद्य, अनिकेत खिलारे, केदार खाडिलकर अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.