डॉ. विद्या देसाई यांच्या वाढदीवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ कळंबे तर्फ कळे संस्थेच्याच्या सचिव प्रा. डॉ. विद्या देसाई यांचा वाढदिवस बुधवार दि. १८ जानेवारी २०२३ रोजी संपन झाला.या वाढदिवसाचे औचित्य साधून आनंदी शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असणारे विविध शाखांमधील पदाधिकाऱ्यानी भामटे गावामधे मोफत आरोग्य शिबिराचे के.पी. सी. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मार्फत आयोजन केले. या शिबिरामध्ये भामटे गावातील ६० हून अधिक लोकांची आरोग्य तपासणी केली व योग्य ते मार्गदर्शन दिले. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष प्रा.सतीश देसाई होते. तसेच विविध शाखांमधील प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.