प्रतिष्ठा न्यूज

सावळजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज प्रतिनिधी : सावळज तालुका तासगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावच्या सरपंच मिनलताई पाटिल व उपसरपंच रमेश कांबळे व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून वंदना घेऊन कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर भारत सरकारच्या नोटरी पदी नियुक्ती झालेले ad. मिलिंद धेंडे, व ad. सुरेश पाटील यांचा ही सत्कार करण्यात आला तसेच आंबेडकर जयंती निमित्त आमदार सुमन वहिनी पाटील यांनीही भेट देऊन अभिवादन केले
या कार्यक्रमास ताजुद्दीन तांबोळी राष्ट्रवादी काँग्रेस सचिव तसेच माजी जिल्हा परीषद सदस्य सागर पाटील, माझी सरपंच संजय थोरात, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा संघटक दीपक उनउने, सोसायटी संचालक प्रशांत कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य विनोद कोळी बहुजन नेते राजेश गायकवाड ,यासह अनेक मान्यवर उपस्थतीत होते.
कार्यक्रमास विश्र्वशांती बोद्ध विहार अध्यक्ष महावीर धेंडे, आरपीआय तालुका अध्यक्ष प्रवीण धेंडे, ad. विजय धेंडे, मनिष धेंडे हर्ष धेंडे  पवन भिसे, गौतम कांबळे, सुभाष धेंडे, पांडुरंग भिसे, सतिश धेंडे, यासह मोठ्या प्रमाणात बौद्ध बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल उर्फ राज भिसे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मयुर धेंडे यांनी केले तर शेवटी आभार   रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सदस्य पांडुरंग भिसे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.