प्रतिष्ठा न्यूज

कवठेएकंद येथे पार पडले अंनिसचे चित्रप्रदर्शन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करणी आणि अंधश्रद्धा या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनीनी अतिशय कल्पकतेने सुंदर कलाकृती कागदावर साकारली,या स्पर्धेतील निवडक चित्रांचे प्रदर्शन शाळा, महाविद्यालयातून शालेय विद्यार्थ्यांना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्या साठी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले.कवठेएंकद येथील जिल्हा परिषद शाळा क्रं १येथे दिनांक १२/१३ऑगस्ट रोजी हे चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक शिवाजीराव गायकवाड यांनी केले, चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन शाळा  व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जावेद जमादार यांनी काळी बाहुली जाळुन केले.त्यांनी मुलांना अंधश्रद्धेपासुन दुर राहण्यास सांगितले.दिनांक १३रोजी चित्रप्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात कवठेएंकद येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते,विजय कोगनोळे यांनी मुलांना मार्गदर्शन केले.कुणीतरी आपल्याला सांगते आणि तेच आपणं पुढे खरं आहे असं समजतो पण हा समज आपल्या बुद्धीने खरं खोटं तपासले पाहिजे,कवठेएंकद गावाचा पुरोगामी इतिहास खुपच मोठा आहे,या चित्रप्रदर्शनातुन पुन्हा एकदा कवठेएंकद येथील मुलांना अंधश्रद्धा आणि त्यामुळे होणारे नुकसान समजण्यासाठी मदत होईल.हे प्रदर्शन आयोजित करण्याचा अतिशय चांगला उपक्रम राबवल्या बद्दल कार्यकर्त्यांचे  त्यांनी कौतुक केले.प्रा वासुदेव गुरव यांनी मुलांसाठी “आभाळाची आम्ही लेकरे”हे गीत सादर केले.भुत कुठेही नसते ते आपल्या डोक्यात असते ते आपण घालवले पाहिजे आणि या चित्रप्रदर्शनातुन तुम्ही हा विचार घ्यावा या हेतुने आपल्या शाळेत हे चित्र प्रदर्शन भरवल्याचे मत अमर खोत यांनी मांडले.शाळेच्या शिक्षिका नुतन परिट यांनी कवठेएंकद येथील विविध शाळांनी आणि ज्येष्ठ नागरिक यांनी  या चित्रप्रदर्शनाला भेट दिल्याबद्दल आभार मानले.विशाल खाडे सहकारी शिक्षक आणि मुख्याध्यापक शिवाजी राव गायकवाड राष्ट्रसेवा दलाची कार्यकर्ती श्रेया परिट व शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिकांचे सहकार्य लाभले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.