प्रतिष्ठा न्यूज

जनआक्रोश पदयात्रेस,मराठा स्वराज्य संघाचा पाठिंबा, शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास संघर्ष आमच्या बरोबर : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : उसाला प्रति टन 5000,दुधाला प्रति लिटर साठ रुपये,द्राक्ष, बेदाणे,तसेच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव द्यावा व राज्य सरकारचे लक्ष शेतकऱ्याकडे जावे म्हणून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्ह्याचे नेते माननीय महेश भाऊ खराडे यांच्या नेतृत्वात सुरू झालेली जन आक्रोश पदयात्रेस मराठा स्वराज्य संघाचे राज्याध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांच्या सूचनेनुसार मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निघालेली जन आक्रोश पदयात्रेत सहभागी होऊन सांगली जिल्ह्याचे नेते व सांगली जिल्ह्यातून 22 दिवस पायी चालून, सहाशे किलोमीटरचा पायी चालत प्रवास करणारे माननीय महेश भाऊ खराडे यांना पाठिंबा दिला आहे. यापुढे शेतकरी संघटना आणि मराठा स्वराज्य संघ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांच्या न्याय हक्कासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये भरभराट आणण्यासाठी एकत्रित लढून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगला भाव देऊन शेतकऱ्यांना चांगले दिवस करण्यासाठी मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी पदयात्रेत सहभागी होऊन माननीय महेश भाऊ खराडे यांना पाठिंबा जाहीर केला. या वेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी सांगितले की काही विशिष्ट कारखाने शेतकऱ्यांच्या उसाला भाव देत नाही,त्यांची पिळवणूक, फसवणूक व त्यांच्या घातलेल्या उसाला एफ आर पी प्रमाणे भाव दिला जात नाहीत व त्यांना ऊस घातलेल्याची बिले देण्यासाठी त्यांना त्रास दिला जातं आहे, त्यांना वेळेवर बिले दिले जात नाहीत,उसाची काटामारी केली जाते अशी अनेक प्रकरणे आमच्यासमोर आले आहेत. भविष्यकाळात जे जे कारखाने शेतकऱ्यांना दर देणार नाहीत व त्यांची फसवणूक करतील त्या कारखान्याबरोबर आमचा संघर्ष अटळ आहे असं राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी जन आक्रोश पद यात्रेत मिरज या ठिकाणी सांगितले. या वेळेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे व मराठा स्वराज्य संघाचे पदाधिकारी जन आक्रोश पदयात्रेत सहभागी होऊन शेतकऱ्याच्या वेगवेगळ्या प्रश्नावर लढायचे असे ठरले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.