प्रतिष्ठा न्यूज

सौ.शारदा मालपाणी यांचा ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक तर्फे ज्ञान सिंधू स्वयंसिध्दा पुरस्काराने सन्मान

प्रतिष्ठा न्यूज
छत्रपती संभाजीमहाराज नगर : दर्यापूर येथील लेखिका, कवयित्री, समाजसेविका सौ.शारदा रामेश्वर मालपाणी यांना नुकताच ज्ञान सिंधू प्रकाशन नाशिक तर्फे ज्ञान सिंधू स्वयंसिध्दा पुरस्कार छत्रपती संभाजीमहाराज नगर येथे श्रीमती प्रतिभाताई इंगोले ज्येष्ठ साहित्यिका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सौ.शारदा मालपाणी या आम्ही सिद्ध लेखिका समूह अमरावती जिल्हा समूहाच्या कार्याध्यक्ष आहेत. तसेच त्या भारतीय साहित्य व सांस्कृतिक तथा फ्रीडम स्टोरी समूह अमरावती जिल्ह्याच्या महिला कार्याध्यक्ष आहेत. तसेच काव्या अंगण साहित्य मंच तथा बहुउद्देशीय संस्थेच्या अमरावती जिल्ह्याच्याअध्यक्ष आहेत. अकोला आकाशवाणीवर त्यांचा काव्य वाचनाचा कार्यक्रम प्रसारित झालेला आहे. श्रीमती कौशल्या देवी जगन्नाथ जी मालपाणी ट्रस्टच्या वतीने त्यांनी आतापर्यंत सहा गरीब गरजूंना स्वतःचे हक्काचे घर बांधून दिलेले आहे तसेच कोरोना काळात एक महिना शंभर लोकांना घरपोच टिफिन पोहोचवलेला आहे गरीब विद्यार्थ्यांना मदत करणे होतकरू व गरीब विद्यार्थ्यांसाठी एमपीएससीचे क्लास मोफत चालवणे असे अनेक कार्यक्रम या ट्रस्टच्या माध्यमातून त्या राबवत असतात. त्यांची नेपाळ येथे होणाऱ्या विश्व साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेली आहे.त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.आदरणीय प्रधानमंत्री यांची दोन पत्रे त्यांना आलेली आहेत. त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सौ.शारदा मालपाणी या आपल्या लोकमत सखी मंचच्या सदस्या आहेत. यापूर्वी त्यांनी दर्यापूर तालुक्याच्या लोकमत सखी मंचच्या विभाग प्रमुख म्हणून काम बघितलेले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.