प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत शनिवारपासून ऐशानी श्रावणसरी एक्झिबिशन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : अजिंकीयन्स वूमन फौंडेशनच्या वतीने नेहमीच महिलांना सक्षम व सबलीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. विविध उपक्रम राबवून महिलांमध्ये आत्मविश्वास व उद्योजकता या गुणांच्या वाढीस चालना दिली जाते.दरवर्षी प्रमाणे महिलांना सर्वच क्षेत्रात आर्थिक दृष्टया सक्षम करण्याच्या उद्देश्याने ऐशानी एक्जीबिशन्स तर्फे शनिवार दिनांक २६ ऑगस्ट आणि रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी राजमती भवन येथे सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत ऐशानी श्रावणसरी एक्झिबिशन चे आयोजन करण्यात येणार आहे.. यावर्षी सहावे आणि नाविन्यपुर्ण प्रदर्शन शनिवारी-रविवारी राजमती भवन याठिकाणी होणार आहे. अशी माहिती संस्थापिका मंजिरी गाडगीळ व सौ स्मिता घेवारे यांनी दिली आहे. या प्रदर्शनात नाविन्यपुर्ण वस्तू, कुर्तीज, इमिटेशन ज्वेलरी, साड्या, हस्तकलेच्या कलाकृतीचे, तसेच खाद्यपदार्थाचे स्टॉल्स असतील. या ऐशानी श्रावणसरी एक्झिबिशनचे उद्घाटन शनिवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते होणार आहे. व २६ ऑगस्ट साय ४ पासून महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम व लकी ड्रो कार्यक्रम आयोजित केला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.