प्रतिष्ठा न्यूज

पद्मश्री डॉ.विठलराव विखे पाटील कृषीरत्न गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे: दि.2 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात शेतकरी सन्मान सोहळा : श्री भागवत देवसरकर

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार 
नांदेड : सहकाराचे जनक सहकारातून शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेणारे सहकार महर्षी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने व शेतकरी दिनाचे औचित्य साधून  दरवर्षीप्रमाणे यंदाही विक्रमी उत्पादन  घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकरी,कृषी,महसूल विभागातील अधिकारी तसेच कृषी शास्त्रज्ञांचा शाल, श्रीफळ, स्मृतिमानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार,सन्मान करण्याची पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची गेल्या 10 वर्षाची दीर्घ परंपरा आहे,यंदाही 2 सप्टेंबर रोजी नांदेड येथे महाराष्ट्राचे महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी सन्मान सोहळा आयोजित केला असल्याची माहिती पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य भागवत देवसरकर यांनी प्रसिद्धी पत्रकार दिली आहे.
पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषीरत्न गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव संपूर्ण महाराष्ट्रातून बोलविण्यात येत आहेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागातून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला बायोडाटा पाठवून त्यामध्ये खर्च किती, उत्पादन टनामध्ये किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांनी द्यावी,तसेच शेतकऱ्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांचा देखील गौरव सन्मान यावेळी करण्यात येणार आहे,या वर्षी कृषि शास्त्रज्ञांमध्ये ज्यांनी ‘तेलबिया (सोयाबीन, भुईमूग, तीळ, सूर्यफूल, मोहरी) उत्पादन वाढीसाठी केलेल्या विशेष संशोधनात्मक कार्यासाठी’ हा विषय निवडला आहे. ज्यांनी तेलबिया पिकामध्ये संशोधन करून नवीन जातीच्या बियाण्यांची निर्मिती केली असेल व त्यावर प्रात्यक्षिक करून अधिक उत्पादन घेतले असेल अशा शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख सादर करावा,तसेच ‘हळद प्रक्रिया उद्योग’ यावर विशेष संशोधनात्मक कार्यासाठी हा विषय निवडला आहे,यांनी बायोडाटा द्यावेत,कृषी क्षेत्राशी संबंधित विशेष पुरस्कार,कृषी क्षेत्रामध्ये विशेष कार्य करणारी शेतकरी उत्पादक कंपन्या,जोड व्यवसायातून कृषी पर्यटन विषयावर कार्य करणाऱ्या शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी यांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव ता. 30 ऑगस्ट पर्यंत राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्र लिंगापूर पोस्ट.आष्टी ता. हदगाव येथे पोहचतील अशा बेताने पाठविण्याचे आवाहन पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.