प्रतिष्ठा न्यूज

सदानंद कांबळे यांचा सुरक्षित एसटी प्रवास सेवा पुरस्काराने गौरव

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावडा आगारामध्ये चालक या पदावर कार्यरत असणारे धुंदवडे गावचे सुपुत्र सदानंद सखाराम कांबळे यांचा सुरक्षित प्रवास एस. टी (विना अपघात दहा वर्षे सेवा ) बॅच देऊन सन्मानित करण्यात आला .आगार प्रमुख मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.
दुर्गम आणि डोंगराळ भाग असणाऱ्या धुंदवडे गावचे सदानंद कांबळे यांच्या नोकरीची सुरुवात २०११ मध्ये चालक पदावर
वेंगुर्ला या आगारात झाली .
. प्रवासी हेच माझे दैवत मानून एस .टी महामंडळात सेवा बजावली .
एस .टी विभागात काम करत असताना शालेय विद्यार्थी पास धारकांच्या पासून ते जेष्ठ नागरिकांना आदराची आणि सन्मानाची वागणूक दिली . तब्बल ९ वर्षानंतर
२०२० मध्ये गगनबावडा आगारामध्ये चालक या पदावरती बदली झाली. तेथे कार्यरत आहेत.अकरा वर्षे कोणत्याही प्रकारचा अपघात न करता सुरक्षित सेवा बजावण्याचे काम त्यांच्या हातून घडले. व त्यासाठी आगारामार्फत त्यांना एस . टी महामंडळ(सुरक्षित प्रवास) विना अपघात दहा वर्षे सेवा दिल्याबद्दल सुरक्षित प्रवास बॅच देऊन गौरविण्यात आले .

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.