प्रतिष्ठा न्यूज

तुरची प्रशिक्षण केंद्रातील सुधीर लोंढे यांचा आदर्श प्रशिक्षक पुरस्कार देऊन सन्मान

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : सशस्त्र पोलीस हवालदार सुधीर हनुमंत लोंढे बक्कल नंबर  141 मुळगाव चिंचोली,ता.माढा जिल्हा सोलापूर हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 सोलापूर येथे भरती झालेले असून सध्या प्रतिनियुक्तीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र,तुरची येथे प्रशिक्षक म्हणून नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थी याना उत्कृष्ठरित्या प्रशिक्षण देण्याचे काम करत आहेत.त्यांनी जिल्हा कवायत निर्देशक कोर्स (D.D.I) पूर्ण केला असून त्यासोबत महाराष्ट्रा सह अनेक राज्यात विविध कोर्सचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेले आहे.सदर प्रशिक्षणाचा वापर ते नवीन भरती झालेले पोलीस प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण देताना प्रभावीपणे करत आहेत.यापूर्वी त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले असून 1 मे 2023 रोजी उत्कृष्ट सेवेबद्दल व सेवाभिलेख ठेवल्याबद्दल मा.पोलीस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालयाकडून त्याना आदर्श प्रशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.