प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेकडून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 1 लाख 90 हजार महिलांची तपासणी

15 नोव्हेंबर अखेर 100 टक्के उदिष्ट पूर्ण करणार - डॉ सुनील आंबोळे यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेकडून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात आतापर्यंत 1,90,301 इतक्या लाभार्थी महिलांची तपासणी करण्यात आली. 3 नोव्हेंबर 2022 पर्यंत मनपाक्षेत्रात या अभियानाचे 86 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे अभियान 15 नोव्हेंबर 2022 अखेर सुरू राहणार असून मनपाआयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 100 टक्के उदिष्ट पूर्ण करणार असल्याचे वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून 26 सप्टेंबर 2022 पासून *माता सुरक्षित तर घर सुरक्षित* हे अभियान राबविले जात आहे. या अंतर्गत महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाक्षेत्रात 10 आरोग्य केंद्रात हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत मनपाक्षेत्रातील एकूण 2,24466 इतक्या महिलांची तसेच गरोदर मातांची बीपी , शुगर, थायरॉईड, सिबिसी यासह अनेक तपासण्या मोफत केल्या जात आहेत. 3 नोव्हेंबर 2022 अखेर मनपा क्षेत्रातील 190301 इतक्या महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
हे अभियान 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार असून 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण होईल अशी माहिती वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी दिली. या अभियानाचा महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहनही डॉ. सुनील आंबोळे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.