प्रतिष्ठा न्यूज

तासगाव मधील गुंठेवारी प्लॉट नियमितीकरण बाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे आदेश ;मनसेचा दणका

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहरात गुंठेवारी प्लॉटचे नियमबाह्य पद्धतीने नियमितीकरण करण्यात आले आहे या प्रकरणाची उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कडून चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेचे रस्ते आस्थापना जिल्हाध्यक्ष अमोल काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली होती.त्यानुसार आज जिल्हा सह आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी तासगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना अमोल काळे यांच्या आलेल्या तक्रार अर्जातील अनुषंगाने स्वयंस्पष्ट अहवाल नगरपरिषद प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.