प्रतिष्ठा न्यूज

नांदेड “शिवजन्मोत्सव समिती 2023” च्या अध्यक्षपदी- कदम, स्वागताध्यक्षपदी- कोल्हेतर, प्रसिध्दी प्रमुखपदी-सिरसाट यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
नांदेड : 19 फेब्रुवारी 2023 रोजी साजरी करण्यात येणाऱ्या स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज “शिवजन्मोत्सव समिती 2023” च्या अध्यक्षपदी- संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील कदम तर स्वागताध्यक्षपदी- संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे व प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी पाटील सिरसाट यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
मराठा सेवा संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती 2023 च्या कार्यकारणी निवडी संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक नांदेड येथील यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वसतिगृह नवा मोंढा नांदेड येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य इंजि शेरा पाटील, मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपानराव क्षीरसागर, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक शिवाजीराव खुडे, पंडीतराव पवळे, शिक्षक परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी पाटील बामणीकर, जिजाऊ ब्रिगेड च्या भारती मढवई, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष संकेत पाटील, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, उद्धव सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अरुणाताई जाधव, आदी प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्ह्यात गेल्या 30 वर्षापासून वैचारिकरित्याव शांततेत जयंती करणारी एकमेव मराठा सेवा संघ संघटना राहिलेली आहे.या शिवजन्मोत्सवात जिल्ह्यातील पुरुष, महिला व लहानाचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे या वर्षीही जयंती दिमाखात साजरी करण्यात येणार आहे.जन्मोत्सवासाठीचा निधी मराठा सेवा संघाच्या खात्यावरच गतवर्षी प्रमाणे जमा करुन पारदर्शकता आणुयात असे मत बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य इंजि शेरा पाटील यांनी मांडले. मराठा सेवा संघ व 32 कक्ष आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान पाटील कदम यांची तर स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सतीश जाधव, पि.के.कदम, प्रेमकुमार कौशल्ये, संभाजी ब्रिगेड विभागीय कार्याध्यक्षपदी श्रीनिवास शेजुळे, नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कपाळे, न्याय कक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर पाटील, दिव्यांग
आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गुबरे, दीपक भरकड, कमलेश कदम, संगमेश्वर लांडगे, अविनाश पाटील, संभाजी ब्रिगेड महानगराध्यक्ष सतीश धुमाळ, मोहन शिंदे, संतोष धामदरीकर, पंडीत धामदरीकर, अंकुश कोल्हे सचिन कदम, नितीन कोकाटे, व्यंकट कदम, बालाजी देशमुख, दशरथ कदम, गजानन इंगोले यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे संचलन दशरथ कदम यांनी तर आभार गजानन इंगोले यांनी मांडले.
यानंतर नियोजन समितीची एक बैठक सेवा संघाच्या नविन मोंढा येथील जिल्हा कार्यालयात “शिवजन्मोत्सव समिती 2023” चे अध्यक्ष- भगवानराव कदम व स्वागताध्यक्ष-सुभाष पाटील कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली त्यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पदी बालाजी पाटील सिरसाट यांची निवड करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ बिग्रेड, चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या तिघांच्याही निवडी बद्दल जिल्ह्याच्या सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.