प्रतिष्ठा न्यूज

मिरज तालुक्यातील निलजी येथे जबरी चोरी करुन बलात्काराची घटना उघड; आरोपी जेरबंद; सांगली एलसीबीची कारवाई

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मिरज तालुक्यातील निलजी येथे जबरी चोरी करुन बलात्काराची घटना घडली असून आरोपीस जेरंबद करण्यात आले आहे. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणने ही कारवाई केली. गजपती शिसफुल भोसले, वय ३० वर्षे, रा. आंबेडकर नगर, बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली. असे संशयिताचे नाव आहे.
गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी, दि. २६/०७/२०२४ रोजी जुना हरीपुर रोड, निलजी येथे फिर्यादी हे घरामध्ये त्यांचे पतीसोबत झोपली असताना रात्री १०.३० वा चे सुमारास संशयीत ४ इसमांनी फिर्यादी यांचे राहते घरामध्ये जबरदस्ती प्रवेश करून त्यांना मारहाण करून सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून यातील एका आरोपीने फिर्यादी यांचेवर जबरदस्तीने बलात्कार केला असल्याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाणेस वरील प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर यांनी सदर घटनेबाबत माहिती घेवून सदर गुन्हा उघडीस आण्णण्याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. तसेच मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली व प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांनी घटनास्थळी भेटी देवून सदर गुन्हा उघडकीस आणणेकरीता वेळोवेळी सुचना व मार्गदर्शन केले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांची पथके तयार करुन सदरचा गुन्हा करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढुन त्यांना ताब्यात घेण्याबाबत आदेशीत केले होते.
त्या अनुशंगाने दि. २१/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक
नितीन सावंत व सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांचे पथकातील सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ/संकेत मगदूम, पोहेकॉ / इम्रान मुल्ला आणि पोना सोमनाथ गुंडे यांना तांत्रीक तपास व मिळालेल्या बातमीच्या आधारे माहिती मिळाली की, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील निलजी गावात जबरी चोरी करुन बलात्कार केलेल्या गुन्ह्यातील आरोपी नामे गजपती भोसले हा लिगंनुर ते बेंळकी गावाकडे जाणारे रोडवर फिरत आहे. नमुद पथक मिळाले बातमीप्रमाणे, लिगंनुर ते बेंळकी गावाकडे जाणारे रोडवरील जलसंपदा कार्यालयाचे बाहेर सापळा लावून थांबले असता, एक इसम संशयीतरित्या फिरताना दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आलेने पोलीस पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव व गाव विचारले असता, त्यांने त्याचे नाव गजपती शिसफुल भोसले, वय ३० वर्षे, रा. आंबेडकर नगर, बोलवाड, ता. मिरज, जि. सांगली असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे सपोनि नितीन सावंत यांनी निलजी येथे केलेल्या जबरी चोरीच्या गुन्हयाबाबत विचारणा केली असता, त्याने सदर गुन्हा हा त्याचे अन्य साथीदारासोबत केला असल्याची कबुली दिली.

गजपती भोसले हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो मिरज ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. ४५२/२०२३, भा.द.वि.स. कलम ३०२ अन्वये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याची माहिती मिळाली.

लागलीच सदर आरोपीस पुढील तपास कामी मिरज ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.

*कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार*

मा. श्री. सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर, मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली.

मा. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज उपविभाग, मिरज यांचे मार्गर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा,
पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे,
सहा पोलीस निरीक्षक नितीन सावंत, स्था. गु. अ. शाखा,
सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, महिला सहा पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे.
सपोफौ / अनिल ऐनापुरे, पोहेकॉ / अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, इम्रान मुल्ला, अमोल लोहार, आमसिध्द खोत, कुबेर खोत, पोना / सोमनाथ गुंडे, अनंत कुडाळकर, श्रीधर बागडी, पोशि / अजय बेंदरे, रोहन घस्ते, सोमनाथ पतंगे, अभिजीत ठाणेकर, सुनिल जाधव, चापोहेकॉ / शिवाजीराव सिद, चापोशिक्र. / सुशांत चिले, स्था. गु. अ. शाखा
पोहेकॉ/ करण परदेशी, पोशि / अजय पाटील, विवेक सांळुखे, कॅप्टन गुंडवाडे, सायबर पोलीस ठाणे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.