प्रतिष्ठा न्यूज

मुख्यमंत्री ग्रामसडक मधून मंजूर असलेल्या कर्नाळ पद्माळे 2 कोटी 2 लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : पद्माळे कर्नाळ हा चा रस्ता 2 कोटी दोन लाख इतक्या निधीचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर करण्यात आला याचे भूमिपूजन दोन्ही गावामध्ये आज कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पद्माळे सरपंच एकनाथ कोळी, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद पाटील, अभिजीत जगदाळे, विलास पाटील, बंडू गुरव, माजी सरपंच सचिन जगदाळे ग्रामसेवक आदी मान्यवर नागरिक तसेच कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते याचबरोबर कर्नाळ गावातील सरपंच संध्याताई कांबळे, केशव पाटील, विकास पाटील, राजाराम मिसाळ,चंद्रकांत पाटील, किरण मगदूम, पांडुरंग मगदूम, मधुकर पाटील, तुषार पाटील, विशाल वाघमोडे, शुभम पाटील, ज्ञानेश्वर पाटील, ठेकेदार श्री गुंजाटे, मुख्यमंत्री सडक योजनेचे अधिकारी वाघमोडे व डोंगरे आदी ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
दोन्ही गावातील जोडणारा शेती रस्ता असल्या कारणामुळे शेतकरी नागरिकांना दळणवळण साठी सोयीचा होणार आहे. हा रस्ता केल्याबद्दल पदमाळे व कर्नाळ गावातील नागरिकांनी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांचे आभार मानून नागरी सत्कार केला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.