प्रतिष्ठा न्यूज

गुवाहाटी येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी संजय पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापक पदी निवड

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : दिनांक 11 ते 15 नोव्हेंबर 2022 या कालावधीत साई ऍथलेटिक्स स्टेडियम गुवाहाटी (आसाम) येथे होणाऱ्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातील 11 खेळाडूंची निवड झाली आहे. त्यामध्ये श्रावणी देसावळे (उंच उडी) सानिका रुपनर (3000 मीटर धावणे) अक्षदा होळकर (10000 मीटर चालणे) भाग्यश्री हादपाड (5000 मीटर चालणे) अथर्व धज (उंच उडी) अवधूत पाटील (थाळीफे) धुळदेव घागरे (3000 मीटर स्टिपलचेस) मयुरेश शिंदे (10000 मीटर चालणे) केतन (पाटील लांब उडी) ऋग्वेद आंबे (ट्रायथलॉन) या खेळ प्रकारात निवड झाली आहे. सदर संघ गुवाहाटी येथे रवाना झालेला असून 37 व्या राष्ट्रीय ज्युनिअर ऍथलेटिक्स अजिंक्य पद स्पर्धेतमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे. यावेळी सांगली जिल्हा संघटनेचे सचिव संजय पाटील यांची महाराष्ट्र संघाच्या संघ व्यवस्थापकपदी अभिनंदनीय निवड झाली आहे.
वरील सर्व खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष गौतम पाटील, कार्याध्यक्ष मनोहर सारडा, खजिनदार मिलिंद खिलारे यांचे प्रोत्साहन मिळत आहे. तसेच संघटनेचे सचिव संजय पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते बापूसमलेवाले, युवराज खटके, राजेंद्र कदम व विजयकुमार शिंदे, हिम्मत शिंदे एनआयएस प्रशिक्षक सीमा पाटील, गणेश सिंहासने, बी. व्ही. कोकरे, आर. पी. मोहिते व पालघरचे क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या विद्यार्थी व प्रशिक्षकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.