प्रतिष्ठा न्यूज

रविवारी सांगलीत महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान : भारत विरुद्ध इराण अशी होणार पहिल्या क्रमांकाची प्रेक्षणीय कुस्ती

सांगली महानगरपालिका आणि विजयंत मंडळ आयोजक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आणि विजयंत मंडळाकडून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर महासंघाच्या मान्यतेने स्व. वज्रदेही पैलवान हरिनाना पवार व स्व. बिजली मल्ल मा आम. पै. संभाजी आप्पा पवार यांच्या स्मृती दिनानिमित्त महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. भारत विरुद्ध इराण अशी होणार पहिल्या क्रमांकाची कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे कुस्ती मैदान रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी दुपारी 3 वाजता, सरकारी घाट आयर्विन पुलाजवळ सांगली येथे होत आहे. अशी माहिती महापौर दिग्वीजय सुर्यवंशी आणि गटनेत्या भारती दिगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महापौर सुर्यवंशी म्हणाले कि, लाल मातीतील रांगड्या कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने महापौर चषक कुस्ती मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. यंदाची ही तिसरी महापौर चषक कुस्ती स्पर्धा आहे. रविवारी होणाऱ्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाचे उद्घाटन उच्च तंत्र शिक्षण तथा शालेय शिक्षणमंत्री मा. चंद्रकांत दादा पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री मा. डॉ. सुरेशभाऊ खाडे, खासदार संजयकाका पाटील, आमदार जयंत पाटील, आमदार विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सायंकाळी ३ वाजता होणार आहे. या कुस्ती मैदानास आमदार सुधीर गाडगीळ, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, माजी खासदार राजू शेट्टी , महापालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती. जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, उपमहापौर उमेश पाटील, माजी उपमहापौर शेखर इनामदार, गटनेत्या भारती दिगडे, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, विरोधीपक्षनेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, प्रधानमंत्री आवास योजना समिती अध्यक्ष जगन्नाथ ठोकळे , माजी आमदार शरद पाटील, नितिनराजे शिंदे, दिनकरतात्या पाटील, पृथ्वीराज बाबा देशमुख, भाजपा जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, भाजपा नेत्या निताताई केळकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे, मकरंद देशपांडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, पै. संभाजी तात्या सावर्डेकर, पै. पृथ्वीराज पवार, पै. नामदेवराव मोहिते, पै.राहुल पवार , महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे, संजीव ओव्होळ , उपायुक्त राहुल रोकडे, स्मृती पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात एकूण 70 कुस्त्या असून यामध्ये पुरुषांच्या 57 तर महिलांच्या 9 कुस्त्या होणार आहेत. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाची प्रमुख कुस्ती पैलवान माऊली कोकाटे ( हनुमान आखाडा, पुणे) विरुद्ध इराणचा नामवंत पैलवान हमीद इराणी यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान कार्तिक काटे (दावनगिरी कर्नाटक) विरुद्ध संतोष दोरवड (शाहू कारखाना) यांच्यात तर तिसरी प्रेक्षणीय कुस्ती पैलवान नाथा पालवे ( पवार तालीम) विरुद्ध पैलवान दादुमिया मुलाणी (कुर्डूवाडी) यांच्यात होणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या विजेत्या मल्लाला मानाची गदा, महापौर चषक व मानाचा पट्टा दिला जाणार आहे अन्य दोन प्रेक्षणीय कुस्तीतील विजेत्याना महापौर चषक, गदा, मानाचा पट्टा देऊन सन्मानित केले जाणार आहे. या कुस्ती स्पर्धेसाठी महापालिकेकडून १४ लाखांचा निधी देण्यात आला आहे. यामध्ये ९ लाखाची बक्षिसे असून उर्वरित खर्च हा नियोजनावर खर्च केला जात आहे. क्रीडा क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी महापौर चषक स्पर्धा महापालिका घेत आहे. महापालिकेच्या माध्यमातून आणि विजयंता मंडळाच्या सहभागाने होणाऱ्या आंतराराष्ट्रीय कुस्ती मैदानास सर्वानी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहनही यांनी पत्रकार परिषदेत केले . यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, पैलवान गौतम पवार, नगरसेवक संतोष पाटील, युवराज बावडेकर , जगन्नाथ ठोकळे, क्रीडाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.