प्रतिष्ठा न्यूज

जी. के. ऐनापुरे यांच्या साहित्यावर रविवारी चर्चासत्र

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, ता.१६ : मराठी साहित्यातील आघाडीचे लेखक जी. के ऐनापुरे यांनी मराठी साहित्य प्रांतात आपल्या कथा,कादंबरी व समीक्षा अशा लेखनाद्वारे भर घातली आहे.त्यांच्या लेखनावर सविस्तर चर्चा व्हावी याहेतूने दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा,कोल्हापूर या संस्थेने त्यांच्या साहित्यावर एकदिवसाचे चर्चासत्र रविवारी (ता.१९)आयोजित केले आहे.
या चर्चासत्रात सकाळी १० वाजता जेष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे हे बीजभाषण करणार अाहेत. जेष्ठ अभ्यासक उदय रोटे हे जी. के ऐनापुरे यांच्या कादंबरीवर बोलणार असून सागर पाटील हे चर्चक असणार आहेत.जी .के ऐनापुरे यांची कथा या विषयी राकेश वानखेडे हे विवेचन करणार असून मोहन लोंढे हे चर्चक आहेत.दुपारच्या सत्रात तीन वाजता जी. के. ऐनापुरे यांची समीक्षा या विषयावर गजानन अपिने बोलतील तर शामसुंदर मिरजकर हे चर्चक असतील.सत्राच्या शेवटी ४.३० वाजता .दत्ता घोलप व संजय साठे हे जी. के .ऐनापुरे यांची प्रकट मुलाखत घेतील.यावेळी शब्द प्रकाशनचे येशू पाटील,सांगलीतील जेष्ठ साहित्यिक व धन्वंतरी डॉ. अनिल मडके आजचे आघाडीचे साहित्यिक व विचारवंत विजय चोरमारे हे उपस्थित रहाणार आहेत.हा कार्यक्रम श्वास सभागृह डॉ. अनिल मडके यांचे हॉस्पिटल गारपिर चौकाजवळ होणार आहे.सर्व साहित्यप्रेमींसाठी कार्यक्रम खुला आहे. कार्यक्रमासाठी सर्वांनी आवर्जून यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष भीमराव धुळूबुळू व कार्यवाह विनोद कांबळे यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.