प्रतिष्ठा न्यूज

करूळघाटात रस्त्यावर डोंगर कोसळला; चौथ्या दिवशीही कोल्हापूर गगनबावडा वाहतूक बंद

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : तालुका व घाटमाथावर पावसाचा जोर कायम आहे. आजही चौथ्या दिवशी  कोल्हापूर गगनबावडा  राष्ट्रीय महामार्गावरील  वाहतूक बंदच राहिली. मांडुकली,खोकुरले  येथील रस्त्यावरील पाणी ओसरले असले तरी किरवे, लोंघे  येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प आहे,तसेच वेतवडे, शेनवडे, मांडुकली येथील बंधारे पाण्याखालीच आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर कायम आहे . मात्र वादळीवाऱ्यांसह अधुनमधून जोरदार सरी कोसळत आहेत.

*करूळ घाटात डोंगरच कोसळला*
जोरदार वाऱ्यामुळे पडझडीचे प्रकार सुरूच आहेत. वैभववाडी-गगनबावडा दरम्यान करूळ घाटात मंगळवारी (ता.२३) सायंकाळी पुन्हा डोंगर कोसळला. दगड, माती आणि झाडांच्या भरावाने ६० ते ७० मीटरचा रस्ता व्यापला आहे.  सतत कोसळणाऱ्या डोंगरांमुळे नव्याने बांधलेल्या रस्त्याचे मोठे नुकसान होत आहे.

*घराच्या भिंती कोसळल्या*
अतिवृष्टीमुळे काल तालुक्यातील अंदुर खेरिवडे, व धुंदवडे येथील तीन घराच्या भिंती कोसळल्या. तर बोरबेट जवळ मोरीच्या कठड्याचा  भराव कोसळल्याने वाहतूक धोकेदायक बनलेली आहे. काल तिसंगी जवळ एक मोठे झाड रस्त्यावर उन्मळून पडले , सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.