प्रतिष्ठा न्यूज

डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालयात करीअर गायडन्स वेबीनार

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : डॉ.ग.गो.जाधव महाविद्यालयाच्या वाणिज्य विभाग व रोजगार मार्गदर्शन कक्ष आणि पुण्याच्या ग्लोबल व्ही स्मार्ट अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यामानाने एकदिवसीय करिअर गाईडन्स वेबीनारचे आयोजन दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमात अमोल जैन यांनी वाणिज्य क्षेत्रातील विविध करीअर संधीच्या विषयी विद्यार्थ्यांना आनलाईन मार्गदर्शन केले. तसेच या आनलाईन कार्यशाळेचे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या करिता महाविद्यालाच्या सभागृहामध्ये प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ए. एस. कांबळे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.एस.एस.पानारी होते. या कार्यक्रमाकरीता प्र.प्राचार्य डॉ.व्ही.एस.पाटील व संस्था अध्यक्ष प्रा. सतिश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे आभार ग्रंथपाल वंदना पाटील यांनी मानले, तसेच याप्रसंगी प्रा. ए.एस.जमादार प्रा. घाटगे एस. एस. प्रा. सरनोबत आर. आर प्रा. येडगे आर. आर.प्रा. एस.एस.देसाई व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.